निर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस

निर्भया कांडातील 'अल्पवयीन' दोषीला मोकळं सोडलं जाऊन नये, या भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस पाठवलीय. 

Updated: Dec 11, 2015, 05:54 PM IST
निर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस title=

नवी दिल्ली : निर्भया कांडातील 'अल्पवयीन' दोषीला मोकळं सोडलं जाऊन नये, या भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस पाठवलीय. 

आयबीनं आपल्या रिपोर्टमध्ये अल्पवयीन आरोपी कट्टरपंथी असल्यानं त्याला सोडण्यात येऊ नये, असं स्वामींनी आपल्या याचिकेत म्हटलंय. यावर कोर्टानं केंद्राला 'आयबीचा रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे' निर्देश दिलेत. 

दरम्यान, सुटकेआधी या आरोपीकडून एक बॉन्ड भरवण्याचा विचार गृहमंत्रालय करतंय.

अधिक वाचा -  'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

आपला फोटो वायरल होण्याची 'त्या'ला भीती
एका मुलीवर अनन्वित अत्याचार करत तिच्या मरणाच्या दाढेत पोहचवणाऱ्या या दोषीला सध्या वेगळीच भीती वाटतेय. बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर लोक आणि समाज आपल्याला जवळ करणार का? आपला कुणी फोटो काढून तो वायरल तर करणार नाही ना? अशी भीती सध्या त्याला वाटतेय.

तीन वर्षांची शिक्षा होणार पूर्ण
१६ डिसेंबर २०१२ रोजी नवी दिल्लीत चालत्या बसमध्ये घडलेल्या 'निर्भया हत्याकांडा'तील आरोपीची शिक्षा या महिन्यात पूर्ण होतेय. अटक झाली तेव्हा या आरोपीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं. 

ज्युवेनाईल जस्टिस कायद्याखाली त्याच्याविरुद्ध खटला चालवला गेला आणि त्याला तीन वर्षांपर्यंत बालसुधारगृहात धाडण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी अल्पवयीन व्यक्तींच्या शिक्षेच्या कायद्यात बदल करण्याच्या मागणीनंही जोर पकडला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.