नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जानेवारीला भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे 'मन की बात, साथ साथ' या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.
याच निमित्ताने भारत-अमेरिकेतील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने मोदी आणि ओबामा संयुक्तपणे संबोधन करणार आहेत. बराक ओबामा 25 तारखेपासून भारत भेटीवर येत आहेत.
नरेंद्र मोदी देशवासियांशी 'मन की बात' द्वारे विविध विषयांवर संवाद साधतात. यंदा मोदींसोबतच ओबामाही भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मोदी आणि ओबामांच्या संयुक्त संबोधनाबाबत भारतीयांसह जगभरात उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.