सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, एक भारतीय जवान शहीद

सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून आज दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे. 

Updated: Jan 5, 2015, 07:02 PM IST
सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, एक भारतीय जवान शहीद title=

श्रीनगर: सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून आज दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे. 

आज दुपारी दोनच्या सुमारास कठुआ आणि सांबा सेक्टरमध्ये पाक रेंजर्सनी बीएसएफच्या २० चौक्यांवर अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. 

पाकिस्तान सैन्यानं रविवारी रात्रीपासूनच कठुआ सेक्टरमधील बोबियान आणि पनसर भागात गोळीबार सुरु केल्याचं बीएसएफचे उपायुक्त शाहिद इक्बाल यांनी सांगतलं. सीमेवरील  तणावपूर्ण वातावरणामुळं सीमा रेषेजवळील गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे साडे तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.