जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांना पक्षाकडून जबाबदारी

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला नटराजन यांना ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

Updated: Dec 15, 2016, 05:02 PM IST
जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांना पक्षाकडून जबाबदारी title=

बंगळुरू : जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला नटराजन यांना ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

शशिकला नटराजन या पक्षाच्या सदस्या नव्हत्या. पण त्यांच्या नियुक्तीसाठी पक्षाच्या घटनेत बदल करण्याची तयारी असल्याचं देखील पक्षप्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

जयललिता यांच्यावर स्लो पॉइजनचा प्रयोग केल्याच्या 2011 साली शशिकला यांच्यावर आरोप झाला होता. जयललिता यांच्या त्या नंतर जवळच्या मानल्या जाऊ लागल्या. जयललिता यांच्या मृत्यूनंतर ते अंत्यविधी होईपर्यंत त्यांच्याजवळ होत्या.