नवी दिल्ली : नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. भूसंपादन विधेयकाबाबत ही चर्चा झाली.
याभेटीत त्यांनी भूसंपादन विधेयकासंदर्भातील कायद्यात केंद्र सरकारने सुचवलेल्या बदलांबाबत चर्चा केली. उद्या दिल्लीत काँग्रेसने शेतकऱ्यांची सभा आयोजित केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.
राहुल यांच्यासह ज्येष्ठ नेते जयराम रमेश व दिग्विजय सिंह हे देखील या चर्चेत सहभागी होते. उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातून शेतकरी दिल्लीत चर्चेसाठी आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.