जयपूर : मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळ आपल्या खास शैलीतील कल्पक जाहिरातींसाठी प्रसिद्ध आहेच. पण आता यात अजून एका राज्याची भर पडली आहे. ते म्हणजे 'राजस्थान'.
राजस्थान पर्यटन विकास मंडळाने राजस्थानची ओळख असलेल्या वाळवंटाच्या वाळूचा वापर करून एक जाहिरात बनवली आहे. यात राजस्थानची संस्कृती, कला, वाळवंट आणि राजस्थानचे उंट या सर्वांचेच कल्पक पद्धतीने दर्शन घडवले आहे.
त्यातल्या लोगोमधील राजस्थानी पुरुषाच्या मिशीच्या आकारातील उंट सर्वांचंच मन जिंकतायतय.
जाहिरातीचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर आणि खासकरून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
पाहा हा व्हायरल व्हिडिओ