कुलभूषण प्रकरणी सलीम - जावेद यांचा पाकला सल्ला...

कुलभूषण जाधवांची पाकिस्तानकडून सुरक्षित सुटका व्हावी, अशी इच्छा पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी

Intern Intern | Updated: Apr 15, 2017, 06:53 PM IST
कुलभूषण प्रकरणी सलीम - जावेद यांचा पाकला सल्ला...  title=

मुंबई : कुलभूषण जाधवांची पाकिस्तानकडून सुरक्षित सुटका व्हावी, अशी इच्छा पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलीय. 

पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपावरुन महाराष्ट्राच्या कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलीय. 'पाकिस्तान नेहमी भारतासोबतचे संबंध सुधारण्याची वक्तव्य करत असतं... त्यादृष्टीने त्यांच्याकडे आता भारतासोबतचे संबंध सुधारण्याची ही चांगली संधी आहे...  निर्दोष व्यक्तीची हत्या करणे हे पूर्ण मानवतेची हत्या करण्यासारखं आहे', असं सलीम खान यांनी ट्विट केलंय.

तसेच प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही ट्विटरवरून कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला इशारा दिलाय. 'पाकनं कुलभूषण जाधव यांना कोणत्याही पद्धतीनं नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला तर ही त्यांची ६५, ७१ आणि कारगिलहूनही मोठी चूक असेल... आपल्यासाठी काय चांगलं आहे, हे त्यांना माहीत असावं अशी मला आशा आहे' असं त्यांनी म्हटलंय.