नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संसदेमधील पंतप्रधान कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनीटं चर्चा झाली. या भेटीमध्ये पवारांनी महाराष्ट्रातील समस्यांबाबत मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत.
महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या चिंताजनक आहेत. साखर उद्योगही अडचणीत आहे. मोदींनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात. तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशा मागण्या पवारांनी मोदींकडे केल्या आहेत.