शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालीय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका इन्स्पेक्टरनं 'आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या प्रकरणाची एफआयआर दाखल न करण्याचे आदेश आपल्याला दिले होते' असा आरोप केलाय. 

Updated: Sep 17, 2015, 08:43 PM IST
शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर title=

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालीय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका इन्स्पेक्टरनं 'आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या प्रकरणाची एफआयआर दाखल न करण्याचे आदेश आपल्याला दिले होते' असा आरोप केलाय. 

2012 साली रायगडच्या जंगलात शीना बोरा हिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची एफआयआर दाखल करणं अपेक्षित होतं. पण, असं झालं नाही. कारण, त्यावेळी तत्कालिन रायगडचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक आर डी शिंदे यांनी आपल्याला या प्रकरणाची एफआयआर दाखल न करण्याचे आदेश दिले होते, असं पोलीस इन्स्पेक्टर सुभाष मिरगे यांनी म्हटलंय. 

या प्रकरणात काहीतरी काळं बेरं असल्याचं आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपल्या तेव्हाच लक्षात आलं होतं, असं तेव्हाचे या प्रकरणाचे अधिकारी सुभाष मिरगे यांनी म्हटलंय. 

मीडिया जगतातील एक मोठं नाव असलेल्या पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिच्यावर 2012 साली तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप आहे. इंद्राणीनं तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यासोबत मिळून 24 एप्रिल 2012 रोजी शीना हिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्नही केला होता. 

शीन बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.