नववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत

 नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शाळेच्या शौचालयात मुलीला जन्म देण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तेलंगाणाच्या एका दुर्गम गावात नाही तर इन्फॉरमेशन टेक्नॉलिजीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या माधापूर येथे घडली. 

Updated: Dec 1, 2015, 11:43 AM IST
नववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत  title=

हैदराबाद :  नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शाळेच्या शौचालयात मुलीला जन्म देण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तेलंगाणाच्या एका दुर्गम गावात नाही तर इन्फॉरमेशन टेक्नॉलिजीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या माधापूर येथे घडली. 

शाळेतील १३ वर्षाच्या विद्यार्थीनीला शाळेतच प्रसव कळा येऊ लागल्या. तिला माहीत नव्हते की तीच्यासोबत काय होते आहे. तिने शिक्षकांना पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यांनी तिला शौचालयात जाण्यास सांगितले. 

शाळेच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला जेव्हा त्यांना समजले की विद्यार्थीनीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना सूचित करण्यात आले. मुलीचे पालक धक्क्यात असून त्यांना कळत नव्हते की आपली मुलगी गर्भवती कशी झाली. 

ही घटना गेल्या शनिवारी घडली. पण प्रकार सोमवारी समोर आला. विद्यार्थीनी आणि तिची नवजात मुलगी रुग्णालयात असून दोन्ही सुरक्षित आहेत. 

शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थीनी नेहमी आपल्या पोटाला कपड्याने झाकत होती. शाळेत बसताना दप्तर समोर घेत होती. त्यामुळे कोणाली तिच्या गर्भवती असल्याचा संशय आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाराची चौकशीचे आदेश दिले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.