नवी दिल्ली : माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण गंभीर होत आहे. दिल्ली पोलिसांनी १७ जानेवारीला दिल्ली - पाकिस्तान आणि दिल्ली - दुबई दरम्यान प्रवास करणा-या प्रवाशांची यादी एअरपोर्ट प्रशासनाकडे मागितली आहे.
सुनंदा पुष्कर यांची हत्या झालीय का?
सुनंदा पुष्कर यांच्या हत्येत परदेशी हात आहे का?
दुबई किंवा पाकिस्तानातून मारेकरी आले होते का?
हे काही प्रश्न सध्या दिल्ली पोलिसांना पडले आहेत. तपास या दिशेने सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी अजूनही पुष्कर यांच्या मृत्यूबाबत अधिकृतरित्या काही वक्तव्य केलेलं नाही. म्हणजेच हा मृत्यू नैसर्गिक होता की खून याबाबत पोलीस खुलेपणाने काहीही बोललेले नाहीत. मात्र पोलिसांच्या तपासाची दिशा पाहता.. एका निराळ्याच गोष्टीवर प्रकाश पडतोय. दिल्ली पोलिसांनी एअरपोर्ट प्रशासनाकडे.
१७ जानेवारी २०१४ या दिवशी प्रवास करणा-या प्रवाशांची लिस्ट मागितली आहे.
दिल्ली पाकिस्तान आणि दिल्ली दुबई या दोन मार्गांवर प्रवास करणा-या यात्रेकरूंची नावं
तसंच त्या दिवशी दिल्लीत येणा-या आणि दिल्लीतून बाहेर जाणा-या प्रवाशांची लिस्ट मागितली आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रवाशांची यादी का मागितली आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दिल्ली पोलिसांना हत्येचा संशय आहे असाही अंदाज आता व्यक्त होतोय. त्यामुळे आता तपास खून या अँगलने होत आहे. त्याचमुळे दिल्लीमधून उड्डाण करणा-या आणि लँडींग करणा-या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.
एवढच नाही तर व्हिसेरा नमुना परदेशात तपासणीसाठी पाठवला जाण्याचीही शक्यता आहे. तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉपही तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पोलिसांनी पाठवले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला कलाटणी देणारं सत्यही बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.