नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले. यामध्ये 30 ते 35 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराकडून या हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून हे व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं आहे.
हे व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करायचं का नाही, याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कर सीमारेषेपलीकडे दोन किमीपर्यंत आत घुसलं आणि सूर्योदय व्हायच्या आधी हल्ला करून परत आल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.