पाटणा : बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान जाहिरातींसह राजकीय नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे.
भाजपसह संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि अन्य पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपला रोखण्यासाठी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्थानिक पक्षांना एकत्र घेत महाआघाडी स्थापन केली आहे.
या निवडणुकीचा निकाल ८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीकडे संपर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.