एकाच दिवशी भारतीय वायूदलाचे दोन अपघात

एकाच दिवसात भारतीय वायूदलाचे दोन अपघात झालेत. राजस्थानात बारमेर जिल्ह्यात वायूदलाचे सुखोई फायटर जेट कोसळलं. 

Updated: Mar 15, 2017, 10:37 PM IST
एकाच दिवशी भारतीय वायूदलाचे दोन अपघात  title=

अलाहाबाद : एकाच दिवसात भारतीय वायूदलाचे दोन अपघात झालेत. राजस्थानात बारमेर जिल्ह्यात वायूदलाचे सुखोई फायटर जेट कोसळलं. दुपारी 2.50च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये तीन ग्रामस्थ जखमी झालेत. दोन्ही वैमानिकांनी ऐन वेळी पॅराशूटच्या सहाय्यानं उडी घेतल्यामुळे ते बचावले. अपघातात काही घरांचंही नुकसान झालंय.

दुसरी घटना उत्तर प्रदेशात अलाहाबादजवळ घडली. वायूदलाच्या चेतक जातीच्या हेलिकॉप्टरला प्रशिक्षणादरम्यान क्रॅश लँडिंग करावं लागलं. कौशंबी इथं हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टर जमिनीवर आदळलं.