ट्रेनच्या जनरल बोगीत जबरदस्ती वसुली करणाऱ्या पोलिसाचा Video व्हायरल

पोलिस जबरदस्ती हप्ता घेतात किंवा वसुली करता हे आपण ऐकलं असेल, कदाचित पाहिलंही असेल पण त्याचा व्हिडिओ कधी पाहिला नसेल. 

Updated: Apr 11, 2016, 06:09 PM IST
ट्रेनच्या जनरल बोगीत जबरदस्ती वसुली करणाऱ्या पोलिसाचा Video व्हायरल  title=

नवी दिल्ली : पोलिस जबरदस्ती हप्ता घेतात किंवा वसुली करता हे आपण ऐकलं असेल, कदाचित पाहिलंही असेल पण त्याचा व्हिडिओ कधी पाहिला नसेल. 

फेसबूक युजर रामचंद्र यादव यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात स्पष्ट दिसते की, एक पोलिस शिपाई कसा जनरल बोगीमध्ये बसलेल्या लोकांकडून जबरदस्ती पैसे वसूल करीत आहे. 

खाली फेसबूकचा व्हिडिओ आहे...

पोलिसाच्या जबरदस्ती वसुलीचा व्हिडिओ रामचंद्र यादव य़ांनी फेसबूकवर टाकला, त्यानंतर हा इतका व्हायरल झाला की त्याला १८ लाख ४९ हजार १९८ व्ह्यूज मिळाले आहेत. 

हा व्हिडिओ कधी काढला याबाबत रामचंद्र यादव यांनी स्पष्ट केले नाही. पण कृती इतकी धक्कादायक आहे की प्रत्येकाला संताप येईल. 

आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे पोलिसांना आदेश देऊन पोलिसावर कारवाई करतील का यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

 

वर्दी को शर्मसार व भ्रष्टाचार का साथ देता एक छोटा सा नमुना।

Posted by Ramchandra Yadav on Tuesday, April 5, 2016