महापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा

विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. 

Updated: Oct 16, 2015, 11:07 PM IST
महापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा title=

मुंबई : विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. 

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा शिवसेना आणि भाजपमधले वाद चव्हाट्यावर आले. राज्यात एकत्र सत्ता उपभोगत असले तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवेसेनेची मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी अखेर वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतली होती... आणि म्हणूनच, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी 'युती'बद्दल केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरलंय.  

अधिक वाचा - शिवसेना-भाजप बहिष्कार सिलसिला कायम, सेनेनंतर आता भाजपची बारी

'सेना आणि भाजपात कोणतेही मतभेद नाही. आम्ही युती म्हणूनच मुंबई, पुणे, नागपूर या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका लढणार आहोत... याबद्दल आमच्यात कोणतंही दुमत नाही' असा दावा मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. 

अधिक वाचा - भाजप-सेना वादावर तूर्तास पडदा!

यावेळी, बिहार निवडणुकांनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचंही त्यांनी सूचित केलंय. 

त्यामुळे, आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील राजकारणात काय काय बदल होणार, याची उत्सुकता आता नागरिकांनाही लागलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.