मुंबई : फक्त १४ व्या वर्षी जर तुम्हाला कोणी २०० कोटींची ऑफर दिली तर ? एका अमेरिकन कंपनीने एका १४ वर्षाच्या मुलाला अशीच एक २०० कोटींची ऑफर दिली आहे पण या मुलाने ही ऑफर नाकारली आहे.
या १४ वर्षाच्या मुलाने प्राथमिक उपचार किट वाटणारी एक मशीन बनवली आहे. याच्या याच मशिनसाठी अमेरिकेच्या एका कंपनीने या विद्यार्थ्याला ही ऑफर दिली आहे. टेलर असं या मुलाचं नाव आहे. टेलरने ही मशीन बेसबॉल खेळतांना दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार मिळावा म्हणून बनवली आहे. बेसबॉल खेळतांना जखमी झालेल्या खेळाडूंकडे पाहूनच त्याला ही आयडीय सुचली आणि त्याने ही मशीन बनवत पेटंटही करुन घेतली.