www.24taas.com, नवी दिल्ली
आसाम दंगलीचे पडसाद मुंबईत पसरले आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या.. भारतात भडकणारा हिंसाचार याला पाकिस्तान जबबादार असल्याचे दिसून आले. आणि त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान कशाप्रकारे भारताच्या विरोधात धोरणं चालवितो आहे हे सुद्धा समोर आलं आहे. देशात अशांतता माजवणारा मजकूर असलेल्या २४५ वेबसाईट्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहे.
यामध्ये आघाडीचे असलेल्या फेसबुक आणि ट्विटरला सरकारने अशा मजकूरांना बंदी घालावी अशी मागणी केली होती. पण ट्विटरने सरकारच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे ट्विटरची साईट ब्लॉक झालेली नाही. तर गुगल, फेसबुकनंही आंतरराष्ट्रीय नियमांचे कारण देत सहकार्य करण्यास नकार दिला आहे.
तसेच अफवा पसरवणारे एसएमएस नेमके कोणी दिले याची माहितीही गुगल आणि फेसबुक देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही प्रक्षोभक फोटो हे पाकिस्तानात तयार करण्यात आल्याचं तापासून पुढे आल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.