अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

Updated: Mar 29, 2016, 10:47 AM IST
अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक title=

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. संसदेजवळील अतिथी केंद्राजवळ हा गोळीबार झाला.

हा गोळीबार म्हणजे कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एका तासाच्या प्रयत्नांनंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांनंतर जगभरात दहशतीचे वातावरण आहे.

इस्टरचा आठवडा असल्याने अमेरिकेच्या संसदेला सुट्ट्या आहेत. त्यामुळे येथे संसदेचे सदस्य उपस्थित नव्हते. पण, हा पर्यटनाचा काळ असल्याने अनेक पर्यटकांची मात्र येथे रेलचेल होती. या गोळीबारात हा आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील टेनेसी राज्याचा तो नागरिक आहे.

दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणाऱ्या 'व्हाईट हाऊस'ची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. आता मात्र ती सामान्य करण्यात आली आहे.