नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं आणि दोन्ही देशांनी जर एका अणुबॉम्बचा ही वापर केला तर एका झटक्यात २ कोटी १० लाख लोकं मारले जातील. याचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नाही तर अर्ध्या जगाला सोसावा लागेल.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब आहेत. जे हिरोशिमामध्ये टाकल्या गेलेल्या 15 किलोटनच्या अणुबॉम्बच्या बरोबरीचे आहेत. अणुबॉम्ब पडल्यास लोकं उष्णता आणि त्याच्या रेडिऐशनेच मारले जातील. त्यानंतर जे वाचतील त्यांना ही जगणं कठिण होऊन जाईल. भोपाळमध्ये गॅस गळती झाली होती तर आजही तेथे मुलं पांगळी जन्माला येत आहेत आणि अणुबॉम्ब तर त्यापेक्षाही आणखी भयानक स्थिती तयार करु शकतो.
अणुबॉम्बचे रेडिएशन लोकांना तडपवून मारतात. वैज्ञानिकांच्या मते, अणुबॉम्बच्या रेडिएशनमुळे तर पृथ्वीवरील ओझन वायुचं अस्तित्व देखील संपूण जाईल. म्हणजेच हवेतून गॅसच निघून जाईल ज्यामुळे वातावरणात बदल घडतो. ऋतू हे बंद होऊन जातील. धरतीवरील झाडे नेहमीसाठी नष्ट होऊन जातील.
वैज्ञानिकांच्या मते जर अणुबॉम्ब टाकला गेला तर यामध्ये 2 कोटी 10 लाख लोकं एका आठवड्यातच मारले जातील. हा आकडा दूसऱ्या महायुद्धातील मारल्या गेलेल्या लोकांच्या तुलनेत अर्धा आहे. म्हणजेच आता जेवढं दहशतवादी मनुष्यांचं नुकसान करतंय तेच अणुबॉम्ब पडल्यानंतर हे नुकसान २ हजार पटांनी वाढणार आहे.
जगातील सर्वात जास्त वनस्पती आणि वृक्ष असणाऱ्या जागेवर कधीच झाडं उगवणार नाहीत आणि २ अरब लोकं हे भूकमारीमुळे मारले जातील. ही माहिती २०१३ मध्ये केलेल्या अणुबॉम्बच्या परिणामांच्या अभ्यासामध्ये सांगितली गेली होती.