पॅरिस : काल स्पेनहून जर्मनीला जाणारं 'एअर बस ए ३२०' हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं.
स्पेनच्या बार्सिलोनाहून उड्डाण घेतलेल्यानंतर फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना विमानाचा रडार यंत्रणेची संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता.
अवघ्या ४६ मिनिटातच विमानाच्या क्रू मेंबर्सनी आपत्कालीन सिग्नल पाठवले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमर्जंसी कॉलनंतर प्लेन काही सेकंदांमध्येच विमान ३८,००० फूट उंचीवरून ५,००० फूट उंचीवर आले होते. नंतर ट्राफिक कंट्रोलला विमानाचे सिग्नल मिळणेही बंद झाले होते.
विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने कंट्रोल रूमच्या संभाषणात 'इमर्जन्सी, इमर्जन्सी' असे अखेरचे शब्द उच्चारले होते. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.