नवी दिल्ली : मलेशियन एअरलाईन्सचे MH-17 हे विमान युक्रेनमध्ये बक क्षेपणास्त्राच्या साह्यानं पाडण्यात आलंय.या क्षेपणास्त्र हल्ल्यात विमानातल्या सर्व 295 प्रवाशांचा मृत्यू झालाय.
अॅमस्टरडॅमहून क्वालालंपूर इथे जाणारं हे बोईंग विमान रशियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 50 मैलांवर कोसळलं. या भागात रशियाला समर्थन करणा-या बंडखोरांचं वर्चस्व आहे. युक्रेन लष्काराचा नेहमीच या बंडखोरांशी संघर्ष सुरू असतो. पण हे क्षेपणास्त्र युक्रेन सरकारनेच डागल्याचा आरोप बंडखोरांचा नेता अलेक्झांडर बोरडोव्हने केलाय.तर युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पेरेशेन्को यांनी हा आरोप फेटाळलाय.
या घटनेनंतर एअर इंडियासह जगभरातल्या प्रमुख विमानसेवांनी आपली विमानं युक्रेनच्या हवाई हद्दीवरुन न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या प्रकरणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.