न्यूयॉर्क: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.
आणखी वाचा - ओबामा-मोदी यांची गळा भेट
काश्मीर मुद्द्यावर आपला भाषणातील 80 टक्के वेळ देणाऱ्या पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, 1947 पासून आतापर्यंत हा मुद्दा निकाली काढण्यात यूएन अपयशी ठरलंय. भारतासोबत चांगल्या संबंधांची गरज आहे. आपल्या देशातील मागणी नाकारत नवाझ शरीफ यांनी इंग्रजीत भाषण केलं. ते म्हणाले 2013 मध्ये पंतप्रधान होताच मी भारतासोबत चर्चा सुरू केली. मात्र अजूनही भारताकडून सीझफायरचं उल्लंघन केलं जातंय.
नवाज शरीफ यांनी यावेळी बोलताना काश्मीरच्या नागरिकांची तुलना त्यांनी थेट पॅलेस्टिनी नागरिकांशी केली. पॅलेस्टिनी आणि काश्मीरी नागरिकांच्या भूमीवर परकियांची सत्ता आहे. त्यामुळं इथल्या जनतेला अत्याचार सहन करावे लागतायेत, असं शरीफ यांनी म्हटलंय. तसंच काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सुटू शकतो. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये संवाद व्हायला हवा, असंही ते म्हणाले.
आणखी वाचा - संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी
यापूर्वी गेल्या रविवारी नवाझ शरीफांनी यूएन महासचिव बान की मून यांची भेट घेऊन काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.