कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील सॅन बर्नांडिनोमधील एका सोशल सर्व्हिस एजंसीवर केलेल्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झालाय. तर १७ नागरिक जखमी झालेत. तीन बंदुकधाऱ्यांनी अपंगाच्या एका संस्थेच्या कार्यालवार हा गोळीबार केला. गोळीबार करून तिघेही फरार झालेत.
गोळीबार खचाखच भरलेल्या एका हॉलमध्ये झालंय. आंततराष्ट्रीय अंपग दिनाच्या निमित्तानं एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथेच हा गोळीबार करण्यात आला.
गोळीबार करून हल्लेखोर एका काळ्या एसयूव्हीमधून फरार झाले. त्यापैकी दोघांना ठार करण्यात आल्याचं आता पुढे आलंय. तर उरलेल्या एकाला जिवंत पकडण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.