समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान ठरणार आशियातील पहिला देश!

समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश ठरु शकतो. संमलिंगी लग्नाबाबतच्या एका खटल्यावर तेथील न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु झालीये. 

Intern Intern | Updated: Mar 24, 2017, 05:26 PM IST
समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान ठरणार आशियातील पहिला देश! title=

तैपेई : समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश ठरु शकतो. संमलिंगी लग्नाबाबतच्या एका खटल्यावर तेथील न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु झालीये. 



न्यायालयाती 14 न्यायाधीशांच्या समितीसमोर या खटल्याची सुनावणी केली जाणार आहे. समलिंगी लग्नांना परवानगी मिळावी यासाठी समर्थन करणारे अनेक नागरिक यावेळी इंद्रधनुष्याच्या रंगांचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.