व्हिडिओ : सध्या, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय... तो त्याच्या अनोख्या आणि नवखेपणामुळे...
या व्हिडिओत एक नदी वाहताना दिसतेय... पण, 'ही पाण्याची नाही तर वाळूची नदी आहे' असंही त्यासोबत म्हटलं गेलंय. हा व्हिडिओ इराणचा असल्याचंही म्हटलं जातंय.
गेल्या वर्षी इराणमधल्या वाळवंटात आलेल्या बर्फच्छादित वादळानं एकच दाणादाण उडवून दिली होती. जोराचा पाऊस आणि जोरदार हवाही यावेळी पाहायला मिळाली. मध्य पूर्व भागात गोल्फच्या बॉलच्या आकाराएवढ्या आकाराचा बर्फ पडल्याचं काही इराकी स्थानिकांचं म्हणणं होतं. यानंतर इराकच्या सरकारला राज्यात आणीबाणी घोषित करावी लागली होती.
अशा वेळी ही नदी वाहताना दिसत होती... ती जरी वाळूची नदी दिसत असली तरी वाहणारा प्रवाह मात्र बर्फाचा आहे. त्यामुळे, ही वाळवंटात वाहणारी बर्फाच्छादित नदी होती, असं आपल्याला म्हणता येईल.