'कट्यार'नंतर आता 'नटसम्राट' नाटकावर चित्रपट

मराठी नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' यावर चित्रपटाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता झी स्टुडिओज आणखी एक नवीन कलाकृती चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे. 

Updated: Nov 25, 2015, 07:10 PM IST
'कट्यार'नंतर आता 'नटसम्राट' नाटकावर चित्रपट title=

मुंबई : मराठी नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' यावर चित्रपटाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता झी स्टुडिओज आणखी एक नवीन कलाकृती चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे. 

कट्यारनंतर आता 'नटसम्राट' या नाटकावर आधारित सिनेमा झी स्टुडिओज प्रदर्शित करणार आहे. नाना पाटेकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

कट्यारला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एक अविस्मरणीय अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्या आहेत. एका अजरामर नाटकाचा चित्रपट करण्याची प्रथा झी स्टुडिओजने सुरू केली आहे. 

नाना पाटेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर यू ट्यूबवर टाकल्यानंतर त्याला आतापर्यंत २ लाख जणांनी पाहिले आहे. त्यामुळे सर्वांना नाना पाटेकर नटसम्राट कसा साकारतो हे पाहण्याची उत्सुकता आहे. 

पाहा नटसम्राटचा पहिला ट्रेलर 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.