AIB ने महाराष्ट्राच्या राजकारणाची उडवली खिल्ली, तुम्ही पाहा

ऑल इंडिया बक** म्हणजे AIB यांनी आपल्या पहिल्या शोला प्रमोट करण्यासाठी नवीन प्रयोग केले आहे.  त्यांनी आपल्या शोला हीट करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला चिमटे काढले आहेत आणि खिल्ली उडवली आहे. 

Updated: Oct 29, 2015, 04:12 PM IST
AIB ने महाराष्ट्राच्या राजकारणाची उडवली खिल्ली, तुम्ही पाहा  title=

मुंबई : ऑल इंडिया बक** म्हणजे AIB यांनी आपल्या पहिल्या शोला प्रमोट करण्यासाठी नवीन प्रयोग केले आहे.  त्यांनी आपल्या शोला हीट करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला चिमटे काढले आहेत आणि खिल्ली उडवली आहे. 

या शो मधील कलाकारांनी स्वतःचे मोठे पोस्टर बनवले आहेत आणि बस स्टॉप, बोर्ड्स आणि सार्वजनिक ठिकाणी लावले आहे. त्यात मराठीतील पंचलाइन्स वापरल्या आहे.  जसे खंबाची हाइट, वातावरण टाइट. 

ते आपल्या शोला प्रमोट करण्यासाठी काही निगेटीव्ह पब्लिसिटी करत आहे. ते म्हणतात बिग बीही याचवेळी शो घेऊन येत आहेत. सर्व जण बिग बीचा शो पाहतील आमचा शो कोण पाहणार... असे बरेच काही. 

ऑल इंडिया बक** चे नाव कोणाला माहीत नाही . AIBने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर कॉमेडी आणि ह्यूमरला नवीन आयाम दिला आहे. त्यांच्या AIB रोस्ट शोवर वाद झाला होता. नेट न्युट्रिलीटीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम यांनी केले आणि प्रशंसा मिळवली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.