अक्षयच्या लाजवाब अभिनयाने सजलेला 'रुस्तम'

अभिनेता अक्षय कुमारला आपण या आधी बेबी, हॉलिडे, गब्बर, एअरलिफ्ट अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमात पाहिलय. या प्रत्येक सिनेमाचा फ्लेवर वेगळा होता पण त्यातल्या त्याच्या भूमिकेविषयी सांगायचं झालं, तर देश भक्ती हा समान धागा या सिनेमांना जोडतो. 

Updated: Aug 12, 2016, 11:13 AM IST
अक्षयच्या लाजवाब अभिनयाने सजलेला 'रुस्तम' title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारला आपण या आधी बेबी, हॉलिडे, गब्बर, एअरलिफ्ट अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमात पाहिलय. या प्रत्येक सिनेमाचा फ्लेवर वेगळा होता पण त्यातल्या त्याच्या भूमिकेविषयी सांगायचं झालं, तर देश भक्ती हा समान धागा या सिनेमांना जोडतो. 

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

यातच आता आणखी एका सिनेमाची भर पडली आहे, या सिनेमाचं नाव आहे रुस्तम. पण रुस्तम हा सिनेमा केवळ देशप्रेमावर बेतलेला नसून, त्या कॅरेक्टरच्या ख-या खु-या प्रेमावरही हा सिनेमा भाष्य करतो. रुस्तम ही गोष्ट आहे एका नौदल अधिकाऱ्याची. नौदल अधिकारी के.एम. नानावटी यांच्यावर आधारित सत्य घटनेवर हा सिनेमा आहे.

कथा

कायम आपल्या ड्युटीमुळे अनेक दिवस घराबाहेर राहणारा रुस्तम अचानक एक दिवस बायकोला सरप्राईज देण्यासाठी काही न कळवताच घरी परततो. जेवढं प्रेम त्याचं आपल्या देशावर आहे, तेवढच जिवापाड प्रेम त्याचं आपल्या पत्नी सिंधियावर आहे. 

मात्र रुस्तमच्या अनुपस्थितीच सिंधियाची जवळीक रुस्तमच्याच जवळ्च्या मित्र विक्रमसोबत अधिकच वाढते. रुस्तम घरी परतल्यावर त्याला या गोष्टीची जाणीव होते, आपल्या बायकोनं आपल्यासोबत विश्वासघात केलाय या रागानं तो विक्रमवर गोळ्या झाडून त्याची हत्या करतो. यानंतर हा सिनेमा एका वेगळ्याच ट्रॅकवर जाताना दिसतो. 

सिनेमाचे बलस्थान

या मर्डर मिस्ट्रीला अनेक रंग चढवले गेलेत. हा खून नक्की रुस्तमनं केलाय़ की या मागे काहीतरी दुसरंच सत्य आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि हीच गोष्ट या सिनेमाचे बलस्थान आहे. म्हणजे खरंतर सत्य आहे हे तुम्हाला ही सिनेमा पाहताना कळतं, मात्र तरीही ते ज्या पद्धतीनं सादर होतं तीच खरी गंमत आहे.

दिग्दर्शकाची मेहनत

दिग्दर्शक टिनू देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचा जॉनर सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे, आणि दिग्दर्शकानं त्याला तशी ट्रिटमेन्ट दिल्यामुळे अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत सिनेमा तुम्हाला धरुन ठेवण्यात यसस्वी ठरतो. 

अभिनय लाजवाब

अभिनेता अक्षय कुमारनं संपूर्ण चित्रपटात जबरदस्त बॅटिंग केलीये. याच बरोबर अभिनेता सचिन खेडेकर, उषा नाडकर्णी, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा या सगळ्या नटांची भूमिका जरी छोटी असली तरी त्यांचं काम उल्लेखनीय आहे. सिनेमाटॉग्राफर संतोष ठुंडियील यांचा कॅमेरावर्क लाजवाब आहे.

खटकणारी गोष्ट

रुस्तम या सिनेमाची एकच गोष्ट खटकते ती म्हणजे या सिनेमाची लेन्थ. हा सिनेमा जर आणिखी क्रिस्प करता आला असतो तर कदाचित आणखी जास्त एंटरटेनिंग झाला असता. सिनेमाची गाणी विशेष करुन 'तेरे संग यारा' छान झालंय. 

तुम्हाला सस्पेन्स थ्रिलरची आवड असेल तर...

तुम्हाला जर सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आवडत असतील, तर रुस्तम हा सिनेमा तुम्ही मिस करु शकत नाही. हा सिनेमा तुमचं नक्कीच मनोरंजन करणार यात शंका नाही. 

किती स्टार्स

या सिनेमाला  ३.५ स्टार्स.