शाहरुख खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल

बॉलिवूडचा किंग खानच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शाहरुख खानविरोधात रईस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रेल्वे स्थानकावर झालेल्या गोंधळ आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटाच्या GRP पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दंगल भडकवणं आणि रेल्वेच्या संपत्तीला हानी पोहोचवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Updated: Feb 15, 2017, 06:06 PM IST
शाहरुख खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खानच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शाहरुख खानविरोधात रईस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रेल्वे स्थानकावर झालेल्या गोंधळ आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटाच्या GRP पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दंगल भडकवणं आणि रेल्वेच्या संपत्तीला हानी पोहोचवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

शाहरुख खान रईसच्या प्रमोशनसाठी मुंबई हून दिल्लीला ट्रेनने गेला होता. या दरम्यान वेगवेगळ्या स्थानकावर त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. कोटा रेल्वे स्थानकावर जेव्हा शाहरुख पोहोचला तेव्हा १० मिनिटं ट्रेन थांबली होती. शाहरुखने यावेळेस अनेक वस्तू चाहत्यांच्या दिशेने फेकले.

स्थानकावर मोठी गर्दी होती. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांना यावेळेस लाठीचार्ज देखील करावा लागला. यामध्ये अनेक स्थानकावरील वस्तूंचं नुकसान झालं. रेल्वे कोर्टाने पोलिसांना याविरोधात तक्रार दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.