मुंबई : दूरदर्शनवरील किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी सरकारने महानायक अमिताभ बच्चन यांना ६.३१ कोटी रूपये देण्याच्या वृत्तामुळे खळबळ माजली होती.
किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी आपण एकही पैसा घेतला नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे, तसेच अमिताभ बच्चन यांनी या घटनेला साफ नकार दिला आहे. याउलट हे काम मोफत केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पैसे घेतल्याचे वृत्त खोटे आहे. मी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत असे विधान अमिताभ यांनी केले आहे.
दूरदर्शनवरील किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी सरकारने अमिताभ यांना 6.31 कोटी रूपये देण्याच्या वृत्तामुळे कॉंग्रेसने शुक्रवारी केंद्र सरकारला फैलावर घेतले होते.
सुत्रांच्या माहितीप्रमाणे दूरदर्शनवरील किसान चॅनेलच्या जाहिरातीसाठी पहिल्यांदा अभिनेता अजय देवगण, काजोल आणि सलमान खान यांचा नावाचा विचार सरकार करत होते. नंतर अमिताभ बच्चन यांच्या नावालाचं मंजुरी देण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.