मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

Updated: Jul 2, 2015, 01:01 PM IST
मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक  title=

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

निलेशवर एका अल्पवयीन मतीमंदी मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी २५ जून रोजी एफआयआर नोंदवण्यात आली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेशनं संबंधित अल्पवयीन मुलीच्या मानसिक आजाराचा फायदा घेत तिच्यावर सार्वजनिक टॉयलेटमध्ये तसंच इतर ठिकाणीही अनेकदा बलात्कार केला. 

पीडित मुलीच्या वर्तनात अचानक झालेला बदल पाहून तिच्या शिक्षिकेनं तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केल्यानंतर ही घटना समोर आली. पीडित मुलीनं मे महिन्यात तिच्यावर अनेकदा बलात्कार झाल्याचं म्हटलंय. 

आरोपी निलेशनं आपला गुन्हा कबूल केलाय. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर 'पॉस्को'सहीत इतर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.