मुंबई : 'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय.
आमिरच्या वादग्रस्त विधाननंतर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून मार्मिक शब्दात हल्ला चढवलाय. 'पुरस्कार वापसी'चा विरोध करत मोदी सरकारची पाठराखण करणाऱ्या अनुपम खेर यांनी आमिरला, 'तुझ्या पत्नीला कुठल्या देशात जायला आवडेल असा प्रश्न तू किरणला विचारला का?' असा प्रश्न विचारत चिमटा काढलाय.
अधिक वाचा - देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
Dear @aamir_khan. Did you ask Kiran which country would she like to move out to? Did you tell her that this country has made you AAMIR KHAN.
— Anupam Kher (@AnupamPkher) November 23, 2015
Dear @aamir_khan. Did you tell Kiran that you have lived through more worse times in this country & but you never thought of moving out.
— Anupam Kher (@AnupamPkher) November 23, 2015
Dear @aamir_khan. When did ‘Incredible India’ become ‘Intolerant India’ for you? Only in the last 7-8 months? #AtithiDevoBhavah
— Anupam Kher (@AnupamPkher) November 23, 2015
Dear @aamir_khan Presumed country has become #Intolerant. Wat do u suggest 2 millions of Indians? Leave India? Or wait till regime changes?
— Anupam Kher (@AnupamPkher) November 23, 2015
Dear @aamir_khan. #SatyamevaJayate u talked about evil practices but gave Hope. So even in ‘Intolerant’ times u need 2 spread Hope not Fear.
— Anupam Kher (@AnupamPkher) November 23, 2015
याशिवाय 'तुला आमिर खान या देशानंच बनवलंय हे तू किरणला सांगितलंस का? हा देश अत्यंत कठीण काळातून जात असतानाही तू कधीच हा देश सोडून जाण्याचा विचार केला नाहीस हे तू किरणला सांगितलंस का? 'अतुल्य भारत' गेल्या सात आठ महिन्यातच 'असहिष्णू भारत' कसा काय झाला? असा प्रश्नही अनुपम खेर यांनी विचारालाय.
देशात गेल्या काही महिन्यांत अस्थिर वातावरण वाढलंय. देशभरात असुरक्षितता वाढलीयं, ते पाहून किरण रावने आपण देश सोडून इतरत्र रहायला जाऊ, असा सल्ला दिल्याचं आमिर खानने म्हटलं होतं. गेल्या काही दिवसात देशात व्हायलन्स वाढलाय, असं सांगत आमिर खानने यावर चिंता व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.