नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतातील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना व्हिसा देण्यास नकार दिलाय. अनुपम यांना कराची लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायचे होते. पाच फेब्रुवारीला हा फेस्टिव्हल होतोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, १८ लोकांपैकी १७ जणांना व्हिसा देण्यात आलाय. अनुपम यांना व्हिसा दिलेला नाही. मात्र पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या सूत्रांचे असे म्हणणे आहे की, अनुपम यांनी व्हिसासाठी अर्ज केलाच नव्हता.
पाकिस्तानने व्हिसा न दिल्याबद्दल अनुपम यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी अनेक दिवसांपासून व्हिसा प्रलंबित असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटलेय.
नुकताच सरकारने अनुपम यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलाय. तसेच काही दिवसांपूर्वी काश्मिरी पंडिताच्या पुर्नवसन आवश्यक असल्याचे विधानही त्यांनी केले होते.