'सैराट' पायरसी प्रकरण, ६ जणांना अटक

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच थिएटरवर हाऊसफुल्लचा बोर्ड दिसत असताना पायरसी प्रकरणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. 

Updated: May 6, 2016, 01:43 PM IST
'सैराट' पायरसी प्रकरण, ६ जणांना अटक title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच थिएटरवर हाऊसफुल्लचा बोर्ड दिसत असताना पायरसी प्रकरणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. 

याप्रकरणी नागराज यांनी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ग्राँट रोड येथे मारलेल्या छाप्यात पायरसीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीये.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुरेंद्र घोसाळकर, हाशिम खान, शहबाज खान, मुश्ताक खान, इब्नेश शहा आणि बबलू उर्फ अब्दुल शहा या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय.  यांच्याकडून चित्रपटाच्या बनावट सीडी तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आलेय. या सर्व आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये. दरम्यान, या प्रकऱणाचा अधिक तपास सुरु आहे.