मुंबई : अभिनेता सलमान हिट अँड रन केस प्रकरणी सलमान खान याने त्या दिवशी दारू सेवन केली होती की नाही यासंदर्भात महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. केवळ दारु बिल पुरेसा पुरावा नाही, असे निररीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.
बारची बिले पुरावे म्हणून सादर केल्याने सलमान खान दारु प्यायला होता हे सिद्ध होत. नाही तसेच रेन बारचा मॅनेजर रिझवान रथंगी आणि मलाई बाग रेन बारचा वेटर यांनी सलमान खानच्या टेबलवर मद्य दिले हे जबाबात सांगितलंय. पण, टेबलावर दिलेले मद्य सलमान खान प्यायला होता हे कुणीही ठामपणे सांगू शकलं नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.
तसेच जे डब्ल्यू मेरीयेटचा पार्किंग मॅनेजर याने सलमान खानला ड्रायव्हिंग सीटवर पाहिले होते, पण जेव्हा तो टीप घेवून वळाला तेव्हा सलमान खान गाडी ड्राईव्ह करुन घेवू गेला हे त्याने पाहिले नाही,
हे त्याने आपल्या जबाबात म्हटलंय. शिवाय घटनेनंतर पोलिसांनी सलमान खानला जे जे रुग्णालयात ब्लड सॅम्पल करता नेले होते.
पण सलमानचे रक्त योग्य पद्दतीने घेतले गेले नाही. साक्षी दरम्यान समोर आले आहे, असे कोर्टाने म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.