'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय. 

Updated: Mar 3, 2015, 02:28 PM IST
'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय. 

सरकारी वकिलांनी सलमानला लायसन्स सादर करण्याची मागणी केली होती. या मागणीवर न्यायालयानं आपला आदेश ३ मार्चपर्यंत सुरक्षित ठेवला होता. २८ सप्टेंबर २००२ रोजी अपघात झाला त्यावेळी, सलमान खान वैध कागदपत्रांशिवय गाडी चालवत होता, असं म्हणत फिर्यादी पक्षानं सलमानच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली होती.  ही मागणी मुंबईच्या एका सत्र कोर्टानं फेटाळलीय. त्यामुळे सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. 

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २००२ साली सलमानकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. रेकॉर्डनुसार सलमाननं २००४ साली ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं होतं. अर्थात, सलमाननं हा दावा धुडकावून लावला होता. सोबतच, आरटीओच्या रेकॉर्डवरही त्याने अनेक प्रश्न निर्माण केले होते. 
 
२००२ मध्ये सलमान खानच्या गाडीनं वांद्रे येथे अपघात झाला होता. सलमानची कार फुटपाथवर चढली होती.  या गाडीखाली फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीनं आपला जीव गमावला होता तर चार जण जखमी झाले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.