मुंबई : किंग खानला अनेकदा तुम्ही फिल्मफेअर अॅवॉर्ड फंक्शन होस्ट करताना तुम्ही पाहिलं असेल... पण, यावेळी फॉर अ चेंज सलमान तुम्हाला या शोचं होस्टिंग करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको...
दबंग खानला हा शो होस्ट करण्यासाठी २.५ करोड रुपयांचं मानधन कबूल करण्यात आल्याचं समजतंय.
शाहरुख हा फिल्मफेअरचा आत्तापर्यंत लाडका असला तरी बिग बॉस फेम सलमान खाननं आपण लाईव्ह स्टेजवरही 'दबंग' असल्याचं सिद्ध केलंय. याचं मोठ्ठं क्रेडिट जातंय ते सल्लू होस्ट करत असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमाला... या शोमुळे सलमान छोट्या पडद्यालाही आपलंस करून घेतलंय.
त्यामुळे नक्कीच सलमान फिल्मफेअर अॅवॉर्डच्या स्टेजवर आणखी काय काय धम्माल उडवून देणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकताही नक्कीच शिगेला पोहचलेली असेल.