घटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी?

सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय. 

Updated: Jul 29, 2014, 03:06 PM IST
घटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी? title=
फाईल फोटो

मुंबई : सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय. 

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, सुझाननं ऋतिककडे घटस्फोटाच्या बदल्यात 400 करोड रुपयांची भली मोठी रक्कम मागितलीय. सुझानच्या या मागणीनंतर मात्र ऋतिक सुदुर बुदूर झालाय. 

दरम्यान, हे प्रकरण 380 करोड रुपयांमध्येही मिटू शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. ऋतिकच्या वतीनं यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

गेल्या वर्षी सुझान आणि ऋतिकनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 13 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर ऋतिक आणि सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या, दोघंही वेगवेगळे राहत आहेत. परंतु, या दोघांची नुकतीच आपल्या मुलांच्या निमित्तानं भेट झाली होती. आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्तानं दोघांनी एकत्र येऊन आपली जबाबदारी पार पाडली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.