मुंबई : कलर्स चॅनलवरील अशोका मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावं पुढे यात होती. पण, एक खात्रीशीर नाव मात्र पुढ्यात येत नव्हतं. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार 'बिग बॉस डबल ट्रबल सिझन ९' मधल्या रिषभ सिन्हाच्या नावावक शिक्कामोर्तब होत असल्याची माहिती आहे.
कलर्स चॅनलवरील चक्रवर्तीन अशोक सम्राट ही मालिका आता एका नव्या वळणावर येणार आहे. त्यामुळे सम्राट अशोकच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. आता त्या रोलसाठी हँडसम रिषभ कुमार परफेक्ट असल्याचं चॅनलच्या सूत्रांचं मत आहे.
चॅनलच्या सूत्रांच्या मते 'खतरों के खिलाडी' मधील सिद्धार्थ शुक्लाला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. पण, मालिकेच्या निर्मात्यांनी मात्र आता रिषभच्या नावालाच पसंती दर्शवली आहे.
रिषभ कडून मात्र यासंबंधी कोणतीच माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाही. आता रिषभ या भूमिकेला कितपत न्याय देऊ शकेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.