पुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला!

सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय. 

Updated: Nov 19, 2014, 05:20 PM IST
पुन्हा एकदा संसारात रमायचंय झीनतला! title=

मुंबई : सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान हिनं आपल्याला पुन्हा एकदा संसारात रमायला आवडेल, असं नुकतंच स्पष्ट केलंय. आज म्हणजेच, १९ नोव्हेंबर रोजी झीनत ६३ वर्षांची झालीय. 

एका ऑनलाईन पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, झीनतनं पुन्हा एकदा लग्न करायचं असल्याचं म्हटलंय. ‘होय मला पुन्हा एकदा लग्न करायचंय... माझी दोन्हीही मुलं आता मोठी झाली आहेत... त्यांच्याबद्दल आता मी निश्चिंत झालेय... त्यामुळे आता मला स्वत:बद्दल विचार करण्याचा अधिकार आहे’ असं झीनतनं म्हटलंय. 

झीनतनं १९८५ मध्ये अभिनेता मजहर खानसोबत लग्न केलं होतं. १९९८ साली मजहरचं निधन झालं. पण, मला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, असंही झीनतनं स्पष्ट केलंय.  

सध्या चांगल्या भूमिकाच मिळत नसल्यानं आपण सिनेमांमधून बाहेर असल्याचं झीनतनं म्हटलंय. झीनतनं ७० आणि ८० च्या दशकातील काळ आपल्या बोल्ड भूमिकांद्वारे गाजवलाय. 

ती हरे रामा हरे कृष्णा, यादों की बारात, डॉन, कुर्बानी, लावारिस आणि दोस्ताना यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.