मुंबई : लग्नानंतर आपल्या या पवित्र बंधनाला जपून ठेवण्याची जबाबदारी पुरूष आणि स्त्री दोघांची असते. हे बंधन तोडण्यात दोघांचा हात असू शकतो. पण पुरूष चिटिंगच्या बाबतीत महिलांपेक्षा पुढे आहेत.
सर्वेक्षणानुसार पुरूष आपल्या सेक्स लाइफशी बोअर होऊन आणि जबाबदारीतून वाचण्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे बाहरख्यालीपणा करतात. जाणून घ्या पाच कारण त्यामुळे पुरूष आपल्या पत्नीला धोका देतात किंवा बाहेरख्यालीपणा करतात किंवा दुसऱ्या महिलेशी शारिरीक संबंध निर्माण करतात.
काही तरी कमतरता दिसते : पुरूषांना नेहमी पसंत असते की त्यांना नेहमी कोणी तरी प्रेम केले पाहिजे. त्यांचे म्हणणे एकले पाहिजे. त्यांना संपूर्ण वेळ दिला पाहिजे. यात कोणत्याही गोष्टीची कमतरता पुरूषांना चिटिंग करण्यात प्रवृत्त करते.
प्रयोगशीलता : रिलेशनशीपचा पहिला अनुभव प्रेम असतो त्याला लग्नानंतर पुरूष मिस करतात त्यामुळे तो अनुभव मिळविण्यासाठी नव्या संबंधाचा शोध करतात. ते पत्नीशी संबंधाने वैतागू लागतात आणि नवा प्रयोग करण्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागतो.
संबंधाना बोअर होऊ : पुरूषांना थोड्या काळातच बदल करणे आवडते, नवा एक्साइटमेंट किंवा थ्रीलच्या चक्करमध्ये नव्या संबंधांच्या शोधात जातात.
पत्नीतील इंटरेस्ट कमी होतो : या प्रकारात पतीचा पत्नीतील इंटरेस्ट कमी होतो. इंटरेस्ट कमी झाल्याने पती नव्या इंटरेस्टीग जोडीदाराच्या शोधात असतो. आपल्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी असे संबंध निर्माण करतो. त्याला वाटते असे करणे योग्य आहे.
बाहेर चांगले वातावरण : यात पुरूषाला वाटते की घरापेक्षा बाहेर चांगले वातावरण आहे. आपल्याला दुसरी व्यक्ती समजू घेईल. त्यामुळे नव्या संबंधाचा जन्म होतो. त्यामुळे तो पत्नीपासून दूर जातो.
ही कारणं असली तरी दोघांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. हे नाते केवळ पती पत्नीचे नसते तर त्या दोघांशी जोडलेल्या अनेक नात्यांचे, जीवांचे आणि भावनांचे असते. त्यामुळे धोका देण्याचा विचार करण्यापूर्वी पुरूषाने या नात्यांकडे पाहिले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.