ती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी

आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. 

Updated: Oct 17, 2014, 10:48 AM IST
ती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी title=

मुंबई : आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. 

आदर्श प्रकरणाची चौकशी झाली असती तर सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख या तीन माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली असती तर काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला असता असं  वक्तव्य या मुलाखतीत माजी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. 

मात्र, अनौपचारिक गप्पांच्या ओघात अनवधानानं केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय... आणि याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केलीय. 

'मी काही मुलाखतीत हे बोललो नव्हतो... ही विधानं अनावधानानं झाली... चर्चेनंतर गप्पा मारत असताना ते सगळे रेकॉर्ड केले गेले... हे सगळं चुकीच्या पद्धतीनं रेकॉर्ड करून घेतलं गेलं... चूक झालेली आहे... त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीय' असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.  

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली ही विधानं आपण अनावधानं अनौपचारिक गप्पांच्या ओघात केली असं म्हटलं असलं तरी आपल्या वक्तव्यांवरून 'क्लिन इमेज' असलेल्या या काँग्रेसच्या नेत्यानं माघार मात्र घेतलेली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.