नागपूर : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या लोणावळ्याच्या बंगल्याच्या वीजबिलाचा प्रश्न आज विधीमंडळात गाजला.
बंगल्याचा कमी वापर होत असतानाही, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बील आल्याचा मुद्दा भाजप आमदार आशिष शेलार यांनी मांडला.
याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले. दरम्यान, सर्वसामान्यांना जास्त बिलं येतात, तेव्हा सरकार दखल का घेत नाही, असा सवाल सपा आमदार अबू आझमी यांनी केलाय.