पुणे : पुण्यात रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपनं उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
रेश्मा भोसले यांनी अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या नावाने भरला पण भाजपचा ए बी फॉर्म जोडला. पक्षाने रेश्मा भोसले या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र दिले. पण अर्ज चुकीचा ठरवल्यानं त्या पक्षाच्या उमेदवार ठरू शकल्या नाही. सतीश बहिरट यांनाही पक्षाने ए व बी फ्रॉम दिला होता. पण पक्षाने रेश्मा भोसले अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितल्यामुळे त्यांचा एबी फॉर्म रद्द केला. त्यामुळे आता 7अ मधून भाजपचा उमेदवार नाहीये. दोघांनाही अपक्ष लढावं लागणार. तर प्रभाग क्र 25 मधील कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत शिवरकर यांचा ए बी फॉर्म अवैध ठरलाय. महापौर प्रशांत जगताप यांच्या विरोधात अर्ज भरला होता.