पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशा धिंडवडे निघाले. गोळीबाराच्या घटना, बलात्कार, चेन स्नात्चिंग या घटनांनी शहर हादरून गेलंय. पुन्हा एकादा गोळाबार झालाय. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पिंपरी चिंचवड मधल्या रावेत परिसरात एका लग्न समारंभावेळी हा थरारक प्रकार झाला. शहराजवळच्या मारुंजी गावचे उपसरपंच विठ्ठल चव्हाण यांच्यावर हा गोळीबार झाला. शहरातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याची प्रचिती दिसून येत आहे. लग्न समारंभात गोळीबार करण्यापर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेलीय. दोन दिवस झाले तरी अजून आरोपी सापडले नाहीत.
ही घटनाच नाही तर शहरात गेल्या तीन महिन्यात झालेल्या घटनांवरून पोलीस काय करतायेत, असा प्रश्न निर्माण झालाय, १ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत शहरात २६ बलात्कार घडलेत तर ९२ विनयभंग याच्या घटना घडल्यात. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत बलात्कार आणि विनयभंगाच्या या घटना दुप्पटीने वाढल्यात. इतर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
शहरातील कायदा सुव्यवस्था कमालीची ढासळलेली असताना पोलीस मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. अशा प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.