पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात तोडफोड करत राडा केला.
शिक्षण हक्क कायदा अंतर्गत देण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेत प्रशासकीय पातळीवर गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याचा निषेध म्हणून ही तोडफोड करण्यात आली.
शासकीय अधिकार्यांना इशारा म्हणून आजची तोडफोड करण्यात आली. यापुढे आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुधारणा झाली नाही तर, आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे ने दिलाय.
तसेच , आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांच्या विरोधात देखील असेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे शिक्षण वर्तुळात आता मनसेची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.