पुणे: बिबट्यांचं मानवी वस्तीत येण्याचे प्रकार सुरुच आहेत. नाशिक जिल्ह्यात बिबट्या शेतात येण्याचे अनेक वेळा दिसले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या प्रगणेत पुणे जिल्ह्यात प्रगणेत बिबट्याचं दर्शन झालं नव्हतं.
मात्र आता आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावात बिबट्याचं दर्शन झालंय. एका विहिरीत बिबट्या पडलाय.
काठापूरमधील शेतकरी सोपान जाधव आणि शांताराम जाधव यांच्या शेतातील विहिरीमध्ये रात्री बिबट्या पडला. तब्बल बारा तास बिबट्या विहिरीत आहे. गंभीर बाब म्हणजे वन विभागाला कळवून देखील वन कर्मच्याऱ्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.