औरंगाबाद : मराठवाड्यात गारपीटग्रस्तांना सरकारने मदतीची घोषणा केली मात्र ही घोषणा म्हणजे जणू बळीराजाची क्रूर थट्टाच ठरली. शेतक-यांना मिळालेल्या मदचीचे आकडे पाहिल्यावर सरकारला खरचं मदत करायची होती का असा प्रश्न पडतो. केवळ हातावर ३७ रुपयांचा चेक टेकवला.
सिल्लोड तालुक्यातील धोत्रा गावात राहणारे हे प्रभाकर जाधव, जाधव यांची याच गावात 3 एकर जागा आहे, राहते घर आहे, आपल्या दोन मुलांसोबत राहणारा हा तसा समाधानी शेतकरी.. मात्र गारपीटीने त्यांचं आयुष्याच बदलून टाकलय. अचानक झालेल्या त्या गारांच्या हल्ल्यात त्यांचं संपूर्ण शेत उद्धवस्त झाले. घरांचे पत्रे उडून गेले आणि त्यांच्या घरातील 100 कोंबडया सुद्धा मृत्युमुखी पडल्या. या नुकासानामुळं जाधव खचले, मात्र कुणीतरी सरकार नुकसान भरपाई देते म्हणून सांगितल्यांनं थोड़ा धीर आला. 3 ते चार महिन्यानंतर सरकारची मदत आली सुद्धा मात्र ती मदत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच खचली. ही मदत होती अवघी 37 रुपयांची. होय जाधवांचे नुकसान दोन ते तीन लाखांच्या घरात मदत मात्र अवघी 37 रुपये. ती मदत सुद्धा एक कोंबडी मेली असा पंचनामा केल्यानं एका कोंबडीची किंमत मिळालीये.
ही गोष्ट फक्त धोत्र्याचीच नाही, तर याच परिसरातील खंडाळा गावाचीही हीच परिस्थिती.. गारपीटीत गावाला जबऱ तडाखा बसला. गावात लाखोंचे नुकसान झाल्यावर मदत मिळाली ती फक्त 1500 ते 3 हजार रुपये.. झी मिडियाची टीम गावात आली कळाल्यावर मदत न मिळालेल्या गावक-यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी एकच गर्दी केली. एकीकडे कोट्यवधींची मदत केली अशा वल्गना करणा-या सरकारनेच आता उघड्या डोळ्यांनी जनतेकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रीया उमटत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.