नागपूर : फूल पॅन्टमध्ये पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात भाषण केलं. यावेळी, भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'साठी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं.
गो हत्या संदर्भात बोलताना त्यांनी, गो हत्येच्या नावावर अफवा पसरवली जात असल्याचं म्हटलंय. केवळ राजनैतिक स्वार्थसाठी हा कलह निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. कायदा पाळूनच सगळे गो सेवक काम करतात... कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कारवाई करेलच... पण, समाजात उपद्रव पसरवणाऱ्या लोकांची आणि गो रक्षकांची तुलना होऊच शकत नाही... समाज आणि प्रशासनानं यातला फरक ओळखावा, असंही त्यांनी म्हटलंय.
मोदी सरकार आलं म्हणजे सर्व सुरळीत झालं असं नाही... डोळे उघडे ठेवून देशाचं रक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी, काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे... मात्र, लडाख आणि जम्मूमध्ये उपद्रव नाही... ज्या ठिकाणी हा उपद्रव सुरू आहे़ तिथं मात्र कठोरपणे निपटावं लागेल... यासाठी केंद्र आणि राज्यची एक भूमिका हवी असंही त्यांनी म्हटलंय.
सीमेवर सावध राहायला हवं... यासाठी सेनेनं पूर्ण तयार राहायला हवं, थोडी चूक महागात पडू शकते... सीमेवर गस्त कडक हवी, त्यात ढिलाई नको, असं म्हणतं सर्जिकल स्ट्राईकसाठी त्यांनी सेना आणि सरकारचं कौतुक केलंय. काश्मीरमधील घटनांसाठी पाकिस्तान जवाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या उपद्रवी कारवायांना भारतानं दिलेलं उत्तर योग्यच आहे. सेनेनं दाखवलेला पराक्रम कौतुकास्पदच आहे... आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असंही त्यांनी म्हटलंय.